‘या’ विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन

पुणे : राज्यातील शासकीय आणि महानगरपालिकांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील बीएससी (पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षणासाठी दरमहा आठ हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला.

हा निर्णय मार्च २०२३ पासून लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विद्यावेतन देण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत बीएससी पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम चालवला जातो. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना एक वर्ष कार्यप्रशिक्षण पूर्ण करावे लागते. कार्यप्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थी रुग्णालयांमध्ये विविध विभागांमध्ये सेवा देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्याशिवाय उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

🤙 8080365706