
कोल्हापूर : दादू चौगुले नगर येथील अष्टविनायक तालीम जवळ असलेल्या श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचा जीर्णोद्धार उद्या बुधवारी 24 मे रोजी सकाळी 8 वाजता श्री गणेश मूर्तीच्या आगमनाने होणार आहे.

यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून 25 मे ते 31 मे या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये श्री गणेश मूर्तीचे सप्ताधीवास 31 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून विविध धार्मिक विधी होणार आहेत. यामध्ये पुण्याह वाचन वास्तुशांत व श्री च्या प्रतिष्ठापना विधीस प्रारंभ त्यानंतर देवता स्थापना. 1 जून रोजी कलशारोहण ,बलिदान, पूर्णाहुती दुपारी 12 वाजता महाआरती होणार असून, दुपारी 12.30 ते 3 वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा त्याचबरोबर ज्यांना देणगी स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी ध्रुव जनरल स्टोअर्स व रोहित जेंट्स पार्लर येथे जमा करावी असे आवाहन, अष्टविनायक तालीम जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
