जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त 22 मे ते 28 मे या कालावधीत जनजागृती सप्ताह

कोल्हापूर : जागतिक पातळीवर 28 मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनाची थीम “आम्ही कटिबध्द आहोत” ही आहे. या दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 मे ते दिनांक 28 मे या कालावधीत जिल्हयात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे.

या सप्ताहात सर्वांनी सहभागी होवुन, स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थान हा एक महत्वाचा घटक आहे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असुन, त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रुढी- परंपरामुळे मुली – महिलांना मोठया प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभुमिवर या दिनाचे औचित्य साधून जिल्हयात चर्चासत्रे, प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आदी उपक्रमांच्या माध्यमातुन जनजागृती करणेत येणार आहे.सप्ताह कालावधीत महिला व किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छता व त्यांचे आरोग्य या बाबींना केंद्रस्थानी ठेवुन जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये सर्व विभागांशी तसेच विविध घटकांचा समन्वय साधुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींमधुन आशा वर्कस, अंगणवाडी कार्याकर्ती, अंगणवाडी सेविका, शिक्षिका, महिला बचत गट यांनी पुढाकार घेवुन मोठया प्रमाणात या सप्ताहानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन व आरोग्याची काळजी या विषयावर महिला व किशोर वयीन मुलींना माहिती देउन जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.

🤙 8080365706