
पालीची दहशत इतकी आहे की लोकांना ते पाहणे तर सोडाच, त्याच्या जवळ येणेही आवडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या घरी पाल का येते?.

उरलेल्या आणि गोड अन्नाचा वास पालींना आकर्षित करतो, म्हणून किचन ओट्यावर अन्न ठेवण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.
छत, खिडक्या, एक्झॉस्ट पंखे आणि व्हेंटिलेशन सिस्टीमच्या माध्यमातून पाली घरात येतात.
जर खोलीतील तापमान जास्त असेल तर पाली आत येण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून दरवाजा बंद ठेवा.
घरातील घाणीमुळे पाली आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे स्टोअर रूम किंवा स्टोरेजची जागा स्वच्छ ठेवा.
खोलीत ठेवलेल्या गरम पाण्याकडेही पाली आकर्षित होतात.
