
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष: आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरीत संघर्षाचे प्रसंग घडतील. काही बाबतीत मानसिक ताणतणाव निर्माण होतील. व्यापारात महत्वाचे निर्णय शक्यतो आज टाळावेत.
वृषभ: आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगले वातावरण राहील. आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापार व्यवसायातील वातावरण चांगले राहील.
मिथुन: व्यापारात उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण वाढेल. दैवी पाठबळ लाभणार नाही. वास्तुविषयी प्रश्न, कामे रेंगाळतील. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी.
कर्कः नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकेल. संशोधनात्मक कार्य आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला फायदा होईल. परंतु, अप्रतिष्ठा होण्याचे योग आहेत.
कन्या: आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. आपले कर्तुत्व सिद्ध झाल्याने जनमानसात प्रतिष्ठा वर्चस्व प्रस्थापित कराल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता आहे.
सिंह: नोकरीत गैरसमजाचे वातावरण राहील. वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढणार आहे. व्यापारात फसगत होण्याची शक्यता आहे.
धनु: पती-पत्नीमध्ये बेबनाव गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घेणे योग्य ठरेल. नोकरीत खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्या विरुद्ध मात्र गैरसमज किंवा निंदानालस्ती होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: नवीन जागा घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नोकरीत प्रशंसा केली जाईल. प्रलोभनाला मात्र बळी पडू नका. व्यापारात नवीन योजना आखाल.
तूळ : आज काही बाबतीत यश संपादन करू शकाल. व्यापार रोजगारात आर्थिक उन्नती होईल पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल.
मकर: आपले वर्चस्व सिद्ध कराल. व्यापारात विरोधक आक्रमक होतील. त्याचा बीमोड करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळेल. स्विकारलेली कामे यशस्वी होतील.
कुंभ: बढतीची शक्यता आहे. नवीन संधी नवीन मार्ग सापडतील. संकुचित मनोवृति टाळावी. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती मिळेल. आपली प्रतिष्ठा वाढीस लागेल.
मीन: अध्यात्म क्षेत्रात रममाण होण्याची शक्यता आहे. भाग्योदय होण्याचा योग असून मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आपले डावपेच यशस्वी होतील.
