
रत्नागिरी – रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठीचे आवश्यक ते सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे.

ठेकेदाराची नियुक्तीही झाली आहे. यामुळे कोल्हापुरातून औद्योगिक उत्पादने, साखरेसह अन्य वस्तूंच्या निर्यातीसाठी मदत होणार आहे.तसेच वाहतूक जलद होऊन त्याचा नागरिक, उद्योजक व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुमारे पाऊण तास एवढ्या वेळेची बचत होणार आहे.रत्नागिरी कोल्हापूर नागपूर या महामार्गापैकी चौपदरीकरणासाठी दोन हजार ११४ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. १३४ कि. मी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ६६७.१३ हेक्टर जमीन संपादित केली आहे. पूर्वी कोल्हापूर शहरातून जाणारा हा महामार्ग आता केर्लीमार्गे (बायपास) वळविण्यात आला आहे. केर्ली- शिये चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
