
कागल : आरोग्यमय धनसंपदा याचे महत्व सांगणारे आणि विश्वशांतीच्या संदेशाचे प्रसारण करणारे महाराष्ट्रातील पाहिले, अद्यावत व सुसज्य हिलींग गार्डन कागल शहरात उभे रहात आहे.या हिलींग गार्डनमुळे कागल शहर नक्कीच पर्यटन नकाशावर येईल.असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

येथील सामाजिक वनीकरणाच्या उत्तरेस प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पाच एकरात उभारण्यात येत असलेल्या हिलींग गार्डनला दिलेल्या भेटी प्रसंगी ते बोलत होते. राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,उत्तर प्रदेश,दिल्ली नंतर महाराष्ट्रातील पहिलीच शाहु महाराजांच्या कागल नगरीत हे वैशिष्ट्यपूर्ण हीलिंग गार्डन उभारण्यात येत आहे.आरोग्यदायी समाजाच्या उभारण्यासाठी ही संकल्पना स्व.राजेसाहेब यांनी मांडली होती. ते पूर्णत्वास नेण्याचे कार्य आमच्या हातून होत आहेयाचा मनस्वी अभिमान आहे. सध्या या रिंगणांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे.शासन स्तरावर यास निधीची कमतरता कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.
यावेळी ब्रम्हाकुमारीच्या सदस्या राजश्री बहेनजी म्हणाल्या,राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातून येथील “हीलिंग गार्डन”साठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. याबद्दल राजे समरर्जीतसिंह यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करते. पाच एकरात उभारण्यात येत असलेल्या या हिलिंग गार्डनमध्ये ध्यानधारणा केंद्र, विश्रांती केंद्र, उपासना केंद्र, प्रार्थना केंद्र,विविध प्रकारचे आरोग्यदायी सेमिनार यासह विविध उपक्रम राबविले जाणार असून मानवी आरोग्य संतुलित ठेवण्याच्या दृष्टीने ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. राजेंच्या या दुरदृष्टीमुळे शहरातील जनतेचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राखण्यासाठी त्यांचे हे कार्य शाश्वत विकासाची उत्तम उदाहरण आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, आनंदा पसारे,शाहू कारखान्याचे संचालक यशवंत माने, सतिश पाटील,राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, आप्पासाहेब भोसले रमिज मुजावर दिपक मगर, पपू कुंभार,यांच्यासह प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवी जीवन सुखकर करणारे “पावरहाऊस”
या अनोख्या उपक्रमातून साक्षात ब्रम्हांडाची,ईश्वराची ताकद अनुभवता येणार आहे. सध्याच्या अत्यंत धक्काधक्कीच्या मानवी आयुष्याला अध्यात्माची गरज असून मानवी जीवन सुखकर करणारे हे एक ” पावरहाऊस” आहे. विश्वशांती हा या संकल्पनेचा मुख्य हेतू असून राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नांमुळे समाजाला या संकल्पनेचा चांगला लाभ होणार असल्याचे यावेळी ब्रम्हाकुमारीच्या कविता बहेनजी यांनी सांगितले.
