
यवतमाळ : शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही.त्यामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित योजनांची कागदपत्रे पालकांकडून शाळेपर्यंत येत नाही. मात्र आता योजना शिक्षण संचालनालय पहिल्यांदाच ‘ॲक्टीव मोड’वर आले असून शाळा सुरू होताच पालकांची कार्यशाळा घेऊन योजनांची माहिती दिली जाणार आहे.

कागदपत्रे गोळा केली जाणार आहेत. त्यामुळे सत्राच्या प्रारंभीच योजनांची अमलबजावणी सुरू होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कसा लाभ पोहोचवता येईल, यासाठी संचालक डाॅ. महेश पालकर यांनी कालबद्ध जागर कार्यक्रम सुरू केला आहे.
