पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

मुंबई : अंदमान समुद्रात दाखल झाला. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले.आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आहे. पुढील ३-४ दिवसांत नैऋत्य मान्सून अंदमान समुद्र,अंदमान निकोबार बेटांवर आणखी पुढे जाणार आहे. मान्सून अंदमानमध्ये 22 मे रोजी दाखल होतो. मात्र यावर्षी तीन दिवस आधीच मान्सून अंदमानमधील पोहचला आहे.यंदाचा मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र 1 जून रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

देशात आणि राज्यात काही ठिकाणी वादळासह विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये २२ ते २४ मे दरम्यान पाऊस पडणार आहे. राज्यात विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

🤙 8080365706