रिपाइंच्या शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशनास कोल्हापुरातून ५००० कार्यकर्ते जाणार- जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे २८ मे रोजी होणार आहे. या अधिवेशनाची तयारीची बैठक शासकीय विश्रामगृह कसबा बावडा या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी कोल्हापूरच्या पुरोगामी नगरीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ५००० कार्यकर्ते जाणार असल्याचा निर्धार आजच्या जिल्हा बैठकीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे होते.

उत्तम कांबळे म्हणाले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं भवितव्य घडविण्यासाठी हे अधिवेशन यशस्वी करणं ही आपली जबाबदारी आहे. या अधिवेशनातून प्रस्थापितांना रिपाइंची ताकद दाखवून देण्याचा निर्धार असून महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते या अधिवेशनासाठी येणार आहेत. पक्षाचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, जनतेचे प्रश्न या राज्य अधिवेशनात मांडून ते जाणून घेण्यासाठी या अधिवेशनात कार्यकर्त्यांनी सहभागी होणं खूप गरजेचं आहे. राज्य सचिव मंगलराव माळगे म्हणाले, शिर्डी हा मागासवर्गीय मतदार संघ यातून २०२४ लोकसभेची तयारी या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार असून आठवले साहेबांच्या पक्षाची ताकद सर्वच पक्षांना दिसून येईल. बैठकीचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी.आर. कांबळे यांनी केले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा रूपाताई वायदंडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठिपकुरलीकर, अविनाश शिंदे, दिलीप कांबळे, विश्वास सरूडकर, सुखदेव बुद्धाळकर,संजय शिंदे, अनिल कांबळे,जयपाल कांबळे, बाबासाहेब कागलकर, वैभव प्रधान यांनी मनोगते व्यक्त केली. या बैठकीला प्रदीप मस्के, नामदेव कोथळीकर, अंजली कांबळे, वैशाली कांबळे, जयश्री जावळे, अतुल सडोलीकर, नामदेव कोथळीकर, धनाजी सकट, बबन कांबळे, सचिन मोहिते ,सचिन केनवडेकर ,बट्टू भामटेकर,सागर जमणे आदी जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नामदेव कांबळे यांनी मानले.

🤙 8080365706