
गगनबावडा: गगनबावडा तालुका लोकसंख्येने व भौगोलिक दृष्ट्या लहान तालुका असल्यामुळे येथील लोकांचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेतीच आहे. साखर कारखाना व काही सहकारी संस्था वगळल्या तर काही शेतकऱ्यांचे जीवन शेती पूरक व्यवसायावर च अवलंबून आहे. यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो.

अशात महसूल विभागाकडून मनमानी कारभाराने शेतकऱ्यांची पिळवणूक होताना दिसत आहे. यामध्ये साळवन परिक्षेत्रात काम करणारे वजनदार अधिकाऱ्याची तर टेबलाखालून काही मिळत नाही तोवर फाईल पुढे सरकतच नाही अशी स्थिती आहे. प्रत्येक शेतकऱ्यासमोर कायद्याचे पाढे वाचत कामात आडकाठी करून पैशाची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्यातुन यासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सगळ्यांना कायद्याची भीती घालणारे हे महाशय स्वतः मात्र राजरोसपणे कायदा मोडत आहेत. जवळच्याच गावात त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका गट नंबर मधील दगड,मुरूम बेकायदेशीर उत्खनन करून शासकीय कामासाठी विक्री केल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. सदरचा गट नंबर ग्रीन झोन मध्ये असलेने यामध्ये उत्खनन करण्यास परवानगी कोणी दिली? जर परवानगी दिली असेल तर त्यासंबंधी चा महसूल शासनास भरला आहे का ? आणि भरला नसेल तर मग *कुंपनच शेत खातंय का?* असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.
संबंधित घटनेची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याने माहिती अधिकारात मिळवली असून येत्या काही दिवसात यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. अशा अधिकाऱ्यावर शासनाकडून कडक कारवाई व्हावी अशी मागणी जनतेतून होत आहे आणि ती होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
