
उलटं चालणे हे १००० पावले सरळ चालण्याच्या बरोबरीचे असते. उलट चालण्यामुळे आपले हृदय जलद गतीने पंप करते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक जलद प्रामाणात होतो. रिव्हर्स वॉकिंग करण्याचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो ते पाहूयात.

स्नायूंसाठी फायदेशीर :- उलट चालण्याने आपल्या पोटरीचे स्नायू , क्वाड्रीसेप्स , ग्लूट्स वर चांगला परिणाम होतो. तसेच मेंदूलाही वेगळ्या पद्धतीने कार्य करण्यास मदत होते.
जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उलटे चालल्याने मानसिक संतुलन सुधारते तसेच शरीरात हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती होते जे तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात.
उलट चालल्यामुळे शरीराच्या अवयवांचे संतुलन सुधारते,असे मानले जाते. तसेच शरीराच्या खालच्या अंगांची हालचाल आणि चालणे यांचा समन्वय साधला जातो. रेट्रो वॉकिंग केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर रिव्हर्स वॉकिंग केल्याने गुडघ्यांमधील सांधेदुखीपासून मुक्तता मिळू शकते.
आपले हृदय उलट चालल्याने वेगाने धडकते, तसेच चयापचय क्रियेत वाढ होते. यामुळे आपण अगदी कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करू शकतो. तसेच शरीराचा समतोल राखण्यासाठी हा उत्तम व्यायाम असल्याचे मानले जाते.
