काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत : अजित पवार

कोल्हापूर : आधी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येत होते पण आता आमचे काँग्रेस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत त्यामुळे’ काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले आहे.

अजित पवारांनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेल्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.पुन्हा एकदा जागावाटपावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानानंतर शरद पवार यांच्यासह अजित पवार तसेच नाना पटोले यांनी जागावाटपावरून कोणतीच चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. आता अजित पवारांच्या या वक्तव्याने काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे या वक्तव्याचेही गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

🤙 8080365706