पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज शनिवारी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० वाजता वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या. ही वाहतूक कोंडी कशामुळे झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. परंतु महामार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत आहे.

🤙 8080365706