अवनि संस्थेमार्फत रेंदाळ गावामध्ये कचरावेचक महिलांचे आरोग्य शिबीर संपन्न

कोल्हापूर : अवनी संस्था गेली ९ वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचकांना संघटीत करण्यचा प्रयत्न करत आहे. सदरच्या महिलांना ओळखपत्र मिळवुन देणे, कचरावेचकांचे बचत गट तयार करणे, हक्काचे घर व त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या व आरोग्याच्या सुविधा मिळवुन देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. कचरावेचक महिलांचे त्वचेचे विकार तसेच हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार तसेच अस्वच्छते मुळे होणारे आजार या पार्श्वभुमिवर अवनि संस्थेने रेंदाळ गावामध्ये कचरावेचक महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबीरास डॉ. अमरसिंह रजपूत यांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला परिसर स्वच्छ, आहार वेळेवर करणे तसेच जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत इत्यादी आरोग्य चांगले राहण्यासाठी माहिती दिली. या शिबीरामध्ये ६४ कचरावेचक महिलांची आरोग्य तपासणी केली.

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी, त्वचारोग, सर्दी, ताप असल्याचे आढळून आले . डॉ . अमरसिंह रजपूत यांनी हिमोग्लोबिन, कॅल्शियम, त्वचारोग, सर्दी, ताप यावरची औषधे दिली. या आरोग्य शिबीराचे प्रास्ताविक जैनुद्दीन पन्हाळकर यांनी केले.

या शिबीरामध्ये ६४ कचरावेचक महिलांनी लाभ घेतला . आभार सुनिता गोसावी यांनी मानले . हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अश्विनी रजपूत, आकांक्षा रजपूत, सविता गोसावी, रेखा गोसावी, छाया गोसावी यांनी परिश्रम घतले .

🤙 8080365706