
नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागणार आहे. यावर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाष्य केलंय. आमची बाजू सत्याची आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. विजय आमचाच असेल, असं अब्दुल सत्तार म्हणालेत.

राहुल नार्वेकर यांचा दौरा पूर्वनियोजित होता. त्याचा आणि निकालाचा तसा काही संबंध नाही, असं सत्तार म्हणालेत. शिवाय कार्यकर्त्यांना ऐवढंच सांगेन की निश्चित राहा, असंही ते म्हणालेत.संजय राऊत ला काय ट्विट करायचे ते करू द्या. त्यांच्या ट्वीटला आता काहीही महत्व नाही. सर्वोच्च न्यायलय जो ही निकाल देईल तो मान्य असेलॉ, असं अब्दुल सत्तार म्हणाले.आम्ही सेनेत होतो तेव्हा आम्ही वाघ होतो आणि पक्ष सोडला की रेडे? रेडे पण आपली भूमिका बजावतात, असं म्हणत सत्तार यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलं आहे.दरम्यान जयंत पाटील यांना आज ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही सत्तार बोललेत. जयंत पाटील हे चांगले नेते आहेत. पण नोटीस मिळाली असेल तर कारवाई व्हायला हवी, असं मत सत्तारांनी व्यक्त केली.
