तंत्रज्ञान अधिविभागातर्फे टेक्नोसिस २०२३ स्पर्धा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातर्फे टेक्नोसिस २०२३ या राज्यस्तरीय स्पर्धेचे रसायन अभियांत्रिकी शाखेतर्फे आयोजन केले होते.

या स्पर्धेचे उद्धघाटनासाठी प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे आणि युनिकेम लॅबोरेटरीज प्रायव्हेट लि.चे अभयसिंग देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रा.डॉ.एस.एन. सपली हे अध्यक्षस्थानी होते. अभय सिंग देसाई यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी ध्येय,ज्ञान व अथक परिश्रम ही यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे असे सांगितले. डॉ. व्ही.एन.शिंदे यांनी शाश्वत विकास व त्या दृष्टीने तंत्रज्ञानाची वाटचाल असली पाहिजे. तसेच २०३५ पर्यंत काही मूलद्रव्य नाहीसे होण्याच्या मार्गावर असतील यासाठी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा उपयोग कसा करता येईल यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी डॉ.सपली यांनी तंत्रज्ञान विभागात विद्यार्थ्यांनी विविध क्लबच्या माध्यमातून घेतलेल्या उपक्रमांचा मागोवा घेतला.

या प्रसंगी प्रा.गिरीष कुलकर्णी हे ही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धेचे समन्वयक श्रीपाल एम.गायकवाड यांनी विविध महाविद्यालयाच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेसेंटेशन,मॉडेल प्रेझेंटेशन, क्वीझ कॉम्पिटिशन या बरोबरच लँन गेमिंग या स्पर्धेत सहभाग घेतला होता अशी माहिती दिली.या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा.डॉ. एस. एच.ठकार उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळातील येणाऱ्या बदलानुसार आपले संशोधन करावे असे आव्हान केले. प्रा.डॉ.पी.डी. पाटील यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिले. डॉ.डी एम. नांगरे, ए.बी. मडावी,डॉ. प्रशांत पाटील, वैशाली मोहिते, शितल देहनकर,निकिता दिंडे आणि रासायनिक अभियांत्रिकेच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरीबा,पायल पाटील,सीमा माने आणि ईशा या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन चंद्रहास शिंदे, अनुज चोपडे व धैर्यशील घोटणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के व प्र .कुलगुरु प्रा.डॉ.पी.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

🤙 8080365706