
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातून ८ लाख ४५ विद्यार्थी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये एव्हरशाईन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी साईषा तुषार राऊत हिने २०० पैकी १५६ गुण मिळवत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या परीक्षेसाठी तिला शाळेतील संस्थापिका, संचालक मंडळ, मुख्याध्यापक ,शिक्षक व आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
