सांगलीमध्ये नीट परीक्षेदरम्यान संतापजनक प्रकार

सांगली : सांगलीमध्ये पार पडलेल्या नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या अंगावरील कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले. त्यानंतर परीक्षा द्यायला लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

याबाबत जागृत पालकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियावरही या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.परीक्षेदरम्यान सांगलीमध्ये मात्र अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. सांगली शहरातील कस्तुरबा वालचंद महाविद्यालयात परीक्षा केंद्र होते. या केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यासाठी चक्क त्यांचे कपडे आणि अंतर्वस्त्र उलटे परिधान करायला लावले. या ठिकाणी विद्यार्थिनींची तपासणी करून त्यांना त्यांचे कपडे उलटे परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. .

🤙 8080365706