
नवी दिल्ली : भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे.

दरम्यान, वाढीव पेन्शनसाठी संघटनेला आतापर्यंत १२ लाख अर्ज मिळाले आहेत.वाढीव पेन्शन योजनेचा पर्याय निवडल्यास निवृत्तीनंतर मिळणारी एकमुस्त रक्कम घटेल. मात्र, पेन्शनची रक्कम वाढणार आहे.वाढीव पेन्शन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी भविष्य निधीबद्दल (ईपीएफ) समजून घेऊ या.ईपीएफओ सदस्यांची २ खाती असतात.१) कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ)२) कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस)कर्मचाऱ्याच्या दरमहा वेतनातून १२ टक्के रक्कम कापून ईपीएफमध्ये जमा होते. कंपनीच्या १२ टक्के कपातीचा मोठा हिस्सा ईपीएफमध्ये, तर एक हिस्सा ईपीएसमध्ये जातो.१६ नोव्हेंबर १९९५ रोजी ईपीएस-९५ ही योजना लागू झाली. १ सप्टेंबर २०१४ पर्यंत ईपीएसमध्ये योगदानासाठी ५,००० ते ६,५०० रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून १५ हजार करण्यात आली.
