‘ राजाराम ‘ साठी अशी होणार मतमोजणी

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.मतमोजणी उद्या मंगळवारी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होणार आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेऱ्यांमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्ष उमेदवारांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस वाढली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर आरोप- प्रत्यारोप झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

🤙 8080365706