आजच्या सभेला जमलेली गर्दीच विजयाची साक्षीदार – धनंजय महाडिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, आजवर कोल्हापूर जिल्ह्याने महाडिक कुटुंबाला भरभरून दिले आहे. महाडिक कुटुंबानेही कोल्हापूर जिल्ह्याच्या सेवेत तीन पिढ्या दिल्या आहेत. असे असताना काही जण महाडिक बाहेरचे अशी टीका करतात.ही टीका करणारी मंडळी आपत्तीच्या वेळी मात्र लपून बसलेली असतात. महाडिक प्रत्येक संकटात ठामपणे कोल्हापूरच्या मदतीसाठी उभे असतात. बंटी पाटील तुमचे एकेक कारनामे बाहेर काढले तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. राजाराम कारखान्याच्या पारदर्शक कारभारावर बोलण्याची तुमची पात्रता नाही. अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

आजची ही सभा म्हणजे आमच्या विजयाची मुहूर्तमेढ आहे. उद्या याच विठ्ठल बिरदेवाच्या साक्षीने आम्ही विजयाचा भंडारा उधळू असा विश्वासही धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.यावेळी नारायण पाटील, शिवाजी पाटील, शामराव तिबिले, महादेव बुडके, कल्पना पाटील, बीए पाटील, सुनील कांबळे, हंबीरराव पाटील, विजय पाटील, दत्तात्रय मेडशिंगे, तेजस्विनी पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706