कागल मध्ये सुमारे साडेसतरा लाख रुपयांची घरफोडी…..

कागल : कागल मध्ये सुमारे साडेसतरा लाख रुपयांची घरफोडी झाली आहे. रोख रुपये अडीच लाख व साडे पंधरा लाख रुपयाचे विविध आकर्षक दागिने यांचा चोरीमध्ये समावेश आहे.

ही घरफोडी तारीख 15 रोजी रात्री झाली आहे. घरातील घाटगे कुटुंबीय बाहेरगावी फिरायला गेले होते .याचा कानोसा घेऊन आज्ञा चोरट्यानी चोरी करून पलान केले आहे. कागल येथील सांगाव रोड लगत असलेल्या दत्त कॉलनीत ही चोरी झाली आहे. याबाबत शंकर कृष्णात घाटगे यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. या घरफोडीने कागल पोलिसांची चांगलीच झोप उडाली आहे.

कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून फिर्यादी शंकर घाटगे यांचे कागल शहरात औषधाचे दुकान आहे. त्यांच्या घरातील मंडळी सुट्टीच्या निमित्ताने बाहेरगावी फिरायला गेली होती. अज्ञात चोरट्यानी कानोसा घेत बंद घराचे कुलूप तोडून, कडी कोंडा उचकटून, घरात प्रवेश केला .बेडरूम मध्ये लहान मोठ्या दोन तिजोऱ्या होत्या. त्या उचकटून त्यातील असणारे साहित्य विस्कटले .लहान तिजोरीमध्ये रोख रुपये अडीच लाख व साडेतीन तोळ्याची एक लाख 55 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन होती .ती चोरून घेतली . तसेच मोठ्या तिजोरीमध्ये आठ तोळ्याचे गंठण सोन्याचे बांगड्या, कानातील पेंडल ,सोन्याच्या टॉप्स, मुलांच्या सोन्याचे ब्रेसलेट, मिनी गंठण, पैंजण, असा सुमारे साडे सतरा लाख रुपयेचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन पोबारा केला.

चोरीची बातमी सकाळी शहरात वाऱ्यासारखी पसरली. चोरी झालेल्या घरासमोर नागरिकांनी तोबा गर्दी केली. दरम्यान कोल्हापूरहून श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. समोर असलेल्या चौकातच श्वान घुटमळले. कागल पोलिसांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक व कागल पोलीस ठाण्यातील पथक .अशी दोन पथके चोरांच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.

कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई ,गडिंग्लज पोलीस उपअधीक्षक अतिरिक्त कार्यभार करवीर श्री नवले, कागलचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे एलसीबी चे पोलीस निरीक्षक श्री सपाटे, श्री शेसमोरे, आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या. व तपास गतिमान केला. या घरफोडीने जणू कागल पोलिसांसमोर मोठे आव्हान चोरट्यानी टाकले आहे .रात्रीची गस्त उपनगरात वाढविणे आवश्यक आहे अशी ही चर्चा होत आहे. पुढील तपास कागलचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे हे करीत आहेत.

🤙 8080365706