
लखनऊ : गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांचा शनिवारी (ता. १५ एप्रिल) रात्री उशिरा प्रयागराज येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. हल्ला होण्यापूर्वी पोलिसांच्या चौकशीत अतिक अहमदने १४ मोठी नावे सांगितली.
त्यात पाकिस्तानमधून राजस्थानमार्गे शस्त्र पुरविणाऱ्या व्यक्तीचे नावही घेतले होते. त्यातून काही ‘व्हाईट कॉलर’ गुंडांची नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्या दिशेने वेगवान चौकशी सुरू केली आहे. प्रयागराजमधील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार करण्यात आला. त्यापूर्वी चौकशीत अतिक अहमदने १४ नावांचा खुलासा पोलिसांकडे केला आहे. त्यात मेरठचा माफिया बदनसिंग बद्दो याचेही नाव आहे. यासोबतच अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या लखनऊच्या साथीदाराचाही शोध सुरू आहे, ज्याने ही रक्कम दिली होती.
