हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्या

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे अंगातून प्रचंड घाम येतो. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. कारण घामाद्वारे शरीरातील पाण्यासोबत आवश्यक क्षार आणि मिनरल्सदेखील कमी होतात. डिहायड्रेशनमुळे हिट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हिट स्ट्रोक पासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असत.

उन्हाळ्यात नेहमी सैलसर आणि सुती कपडे वापरावे. ज्यामुळे शरीराला पुरेशी हवा मिळू शकते. मात्र उन्हाळ्यात जर घट्ट आणि तंग कपडे घातले तर शरीरातील हवा खेळती राहत नाही. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळत नाही आणि यामुळे अंगावर खूप घाम येऊन घामोळ्या येऊ शकतात. उन्हाळाच्या दिवसांत किमान दोन वेळा अंघोळ करावी. दिवसातून किमान दोन वेळा अंघोळ केल्यास शरीराला थंडावा मिळू शकतो. कोमट पाणी तुमच्या शरीराचे तापमान कमी करते, घाम येणे कमी करते, ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. म्हणून उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. अती तेलकट, मसालेदार पदार्थ पचनास जड असतात. या पदार्थांमुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. ज्यामुळे तुम्हाला पित्त आणि अपचनाचा त्रास होतो. तसेच तुमच्या शरीरातील तापमान बदलते. यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होते. यासाठी उन्हाळ्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळून पचनास हलका आहार घ्यावा. आपल्या शरीराला मुबलक पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी, क्षार आणि मिनरल्स बाहेर निघून जातात. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी सतत कमी जास्त होत असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसभरात मुबलक पाणी पिणं आवश्यक आहे. धोका टाळण्यासाठी उन्हाळ्यात दर अर्धा तासाने एक ते दोन घोट पाणी सतत पीत राहिले पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहील. याचबरोबर घराबाहेर पडताना पाण्याची बाटली सोबत ठेवण्यास विसरू नका.

🤙 8080365706