लोकनगरी गृहप्रकल्पात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन, सोसायटीच्या कार्यालयाचेही हस्तांतरण

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंर्गत बांधलेल्या व केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाकडून ‘गुणवत्ता प्रमाणपत्र (सर्टिफिकेट ऑफ मेरिट) २०२२’पुरस्कार मिळालेल्या रामसिना ग्रुपच्या नागाळा पार्क येथील लोकनगरी गृहप्रकल्प येथे नव्या सुविधेच्यादालनाचा शुभारंभ पार पडला.

लोकनगरी सोसायटीच्या उद्घाटनासह हस्तांतरण व गृहप्रकल्पासाठी उभारण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनमहापालिकेचे माजी शहर अभियंता व पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रामसिना ग्रुपचे कार्यकारी संचालक सचिन ओसवाल, विकेश ओसवाल, लोकनगरी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष सुर्यकांत जाधव व सचिव दिलीप सावंत आदी उपस्थिती होते. लोकनगरी सोसायटीच्या सोसायटीच्या सभादासाठी ८२० चौरस फूट इतक्या बांधकामाचे कार्यालय आहे.लोकनगरी गृहप्रकल्पासाठी उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प हा हरितव्यवस्थेशी निगडीत आहे. तब्बल ६० किलो वॅटचा सोलर प्रोजेक्ट आहे.या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे दर महिन्याला सहा हजार युनिटस वीजेची निर्मिती होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात १४३.६२टक्के इतकी बचत होणार आहे.

रामसिना ग्रुपतर्फे पर्यावरणपूरकरित्या बांधलेला हा गृहप्रकल्प कौतुकास पात्र ठरला आहे. या गृहप्रकल्पात एकूण २५० सदनिका आहेत. तसेच हवामानपूरक प्रकल्प, उत्तम रचना, पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आवश्यक साधन सुविधा, सुरक्षितता, आयएसआय गुणवत्ता प्रमाणपत्र बांधकाम साहित्य, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उतारमार्गची सोय, वृक्षारोपण, हरितव्यवस्था, भूंकपरोधक संरचना,मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र, तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्षम सामाईक प्रकाश व्यवस्था आणि स्वयंमपातळी मापन आधारित पाणी टाकीभरण्याची व्यवस्था अशा विविध सुविधा या प्रकल्प अंतर्गत देण्यात आल्या आहेत अशी माहिती ग्रुपचे कार्यकारी संचालक सचिन ओसवाल यांनी दिली.

🤙 8080365706