
अहमदनगर: अहमदनगर शहरातील कापड बाजारात शुक्रवारी दोन व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ आज नगर शहरात बंद पाळून व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त करत ठिय्या आंदोलन केलं.या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाकडून मोठा फौज फाटा या परिसरात तैनात करण्यात आला आहे.नगर शहरातील व्यापाऱ्यांवरील जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यात आलं आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
