
कोल्हापूर : सम्राट अशोक यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत साऱ्याच क्षत्रिय राजानी गौतम बुद्धांचा समतावादी ,अहिंसा आणि करुणा या मूल्यांचा आदर केला आहे त्यामुळे आजच्या साऱ्या क्षत्रियांनी बुद्ध विचारांचा मागोवा घेण्याची नितांत गरज आहे. ब्राह्मणेतर साऱ्यांनी जर बुद्ध धर्मा प्रमाणे वाटचाल केली नाही तर पुन्हा एकदा गळ्यात मडके आणि पाठीला झाडू बांधायला हे मनुवादी कमी करणार नाहीत असा स्पष्ट इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ .सुभाष देसाई यांनी महामानवांचा संयुक्त जयंती समारंभात बोलताना दिला.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारमंच मोरेवाडी व पाचगाव यांनी हा समारंभ आयोजित केला होता अध्यक्षस्थानी विचार मंचचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य होते .मोरेवाडीचे सरपंच आनंदा कांबळे आणि पाचगावच्या सरपंच सौ प्रियांका पाटील यांनी मनोगत व्यक्त केले डॉ. सुभाष देसाई पुढे म्हणाले भारतीय राज्यघटनेने तुम्हा आम्हाला धार्मिक गुलामगिरीतून एकदा मुक्त केले आहे पण काही संघटनांचा राजकीय शक्ती वापरून पुन्हा एकदा बहुजनांना धार्मिक गुलामगिरी मध्ये अडकवून राज्य चालवायचे आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ तुम्हाला होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक पुढच्या पिढीला कृत्रिम बुद्धिमत्ते सारख्या गोष्टींचे शिक्षण तुम्हाला द्यावे लागेल. कर्मकांडामध्ये फुकट वेळ आणि पैसा तुम्ही घालवू नका असेही डॉक्टर सुभाष देसाई यांनी तर्क शुद्ध रीत्या पटवून दिलेकार्यक्रमात मोरेवाडी पाचगाव मधील तीन पीएचडी धारक व्यक्तींचा व एक कायद्याची पदवी घेतलेल्या तरुणीचा सत्कार करण्यात आला शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम समाप्त झाला या कार्यक्रमाला विविध जाती धर्मातील लोकांनी उपस्थिती लावली होती.
