
कोल्हापूर – शिवाजी उद्यम नगर येथील वालावलकर हॉस्पिटल मध्ये माईड मंत्रा हब यांच्या समावेत ‘ आजच्या डिजिटल युगात पाल्यांना घडवताना ‘ याविषयी पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे .
गेली 20 वर्षाहून अधिक काळ पालक आणि मुले समुपदेन क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असलेले *डॉक्टर संतोष शिरशीकर आणि डॉक्टर जयानंद नलवडे यांच्यासह वालवालकर हॉस्पिटलचे नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर विरेंद्र वणकुद्रे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत . येत्या 15 एप्रिल रोजी शनिवारी दुपारी तीन वाजता शिवाजी उद्यम नगर येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये ही कार्यशाळा संपन्न होत आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या कार्यशाळेमध्ये मोबाईल मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवावे , मुलांच्या आवडीनिवडी आणि बुद्धिमत्ता , मुलांना सोशल कसे बनवावे , बालक आणि पालकांच्या तील संवाद तसेच मोबाईल आचारसंहिता प्रथम स्वतः कशी बाळगावी, मुलाचा अभ्यास – छंद – परिक्षा यश आणि मित्र परिवार ‘ अशा विविध पैलूंनी मार्गदर्शन केले जाणार आहे .ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य असून आहे मात्र त्यासाठीपूर्व नाव नोंदणी गरजेचे आहे .तरी इच्छुक पालक – सामाजिक कार्यकर्ते यांनी यासाठी 7020997575 तसेच 8262033773 या मोबाईल क्रमांकावरील व्हाटस अप वर आपला नांव – पत्ता व संस्था विषयी माहिती फोन नंबर देवून व संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा . एलईडी प्रोजेक्टर सह *मार्गदशन होणाऱ्या या कार्यशाळे त प्रवेश संख्या मर्यादीत आहे या कार्यशाळेत समुपदेशनासह मनःशांती साठी प्रात्यक्षिक ही घेतले जाणार आहे तरी यांचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन वालावलकर हॉस्पिटलच्या वतीने संयोजक समन्वयक संतोष कुलकर्णी आणि माईड मंत्रा हब वतीने डॉ .संतोष शिरशीकर – डॉ जयानंद नलवडे यांनी केलेले आहे.
