
पुणे : शनिवारवाडा परिसरातील बांधकामाबाबत वस्तुस्थितीची माहिती गोळा करून, ती राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे.त्यानंतर राज्य शासनाकडून या भागातील बांधकाम नियमावलीत बदल करण्यासाठीची शिफारस घेऊन, केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री यांच्याबरोबर लवकरच बैठक बांधकामांचा प्रश्न सोडविण्यात येणार येईल अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांसह काही इमारतींची पुर्ननिर्मिती थांबली आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवलाखा- गायकवाड वाडा येथे स्थानिक नागरिकांची बैठक घेऊन परिसराची पाहणी केली. यावेळी शनिवारवाडा कृती समितीचे प्रमुख सौरभ संजय पवार, सुहास कुलकर्णी, गणेश नलावडे, मुरलीधर देशपांडे, संदीप खर्डेकर, देवेंद्र सातकर, संदिप जयस्वाल, योगेश समेळ, योगेश खडके, पांडुरंग करपे, मुकुंद चव्हाण, अशोक येनपुरे, अश्विन होले आदी उपस्थित होते.
