
बीड :भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सार्वजनिक जीवनात वावरत असताना स्वत: च्या भावना बाजूला ठेवून वागावं लागतं, असं सांगितलं आहे.बीडमध्ये आयोजित बालाजी डेकोरेशन ॲन्ड इव्हेंटस या फर्मच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपली मनातील भावना बोलून दाखवल्या.
आपल्याला कितीही दुख: असलं तरी लोकांमध्ये गेल्यानंतर हसावं लागतं. आपण आजारी असलं तरी आपण शब्द दिला असेल तर तिथं जावं लागतं. घरात कुणी आजारी असेल तरी जावं लागतं. आपल्याला हसू येत असलं तरी लोक दुख:त असतील तर आपल्यालाही दु:खी व्हावं लागतं, असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत.
