कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.
हा दौरा यशस्वी करण्यासाठी आज जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे व. राज्य सचिव मंगलराव माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह या ठिकाणी. कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उत्तमदादा कांबळे म्हणाले, आठवले साहेबांचं सोमवारी दिनांक 10 एप्रिल रोजी दुपारी 4.00 वाजता. बेळगाव विमानतळावर आगमन होईल यानंतर बेळगाव शासकीय विश्रामगृहावर येऊन सामाजिक न्यायभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधून कामाचा आढावा घेतील.5.00 वाजता गडहिंग्लज येथे होणाऱ्या मागील काही महिन्यामध्ये निधन झालेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या आदरांजली सभेसाठी उपस्थित राहणार असून यानंतर कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या कालकतीत हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टच्या आयोजित केलेल्या भीम महोत्सव या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी त्यांचा हा दौरा हजारो यशस्वी करण्यासाठी व आठवले साहेबांचे स्वागत करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला.पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रूपाताई वायदंडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा संघटक राजेंद्र ठिकपुरलीकर , शहराध्यक्ष सुखदेव बुद्धाळकर, कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे, करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर. युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, मातंग आघाडी जिल्हाध्यक्ष संजय लोखंडे,प्रदिप मस्के, जयपाल कांबळे, अविनाश अंबपकर,जयसिंग पाडळीकर, तानाजी कांबळे, नामदेव कोथळिकर,शशिकांत कांबळे, यांसहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.