राखी सावंत यांची तुलना केवळ अमृता फडणवीस यांच्याशीच होऊ शकते , माझ्याशी नाही : सुषमा अंधारे

परभणी : परभणीतल्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान बोलताना सुषमा अंधारे यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राखी सावंत यांची तुलना अमृता फडणवीस यांच्याशी होऊ शकते माझ्याशी नाही, असं म्हणत मोहित कंबोज यांनी केलेल्या तुलनेचा अंधारेंनी समाचार घेतला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच भाजपचे अनेकजण माझ्यावर कुठल्याही स्तराला जाऊन हल्ला करत आहेत. माझ्या स्त्रीपणावर घाला घातला जातोय, पण मी चळवळीचं शास्त्र शिकून आली आहे. मी हार मानणार नाही. मी बाईपणाचं कोणतही विक्टिम कार्ड खेळणार नाही. मी लढेन आणि होय मी जिंकेन आणि मीच जिंकेन, खात्रीनं जिंकेन. मला डॅमेज करण्याचा जो प्रयत्न हे सर्वजण करतात, तो प्रयत्न मी सक्सेस होऊ देणार नाही.”

मोहित कंबोज यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “माध्यमांचे प्रतिनिधी मला मोहित कंबोज यांच्या टीकेवर प्रतिक्रिया का देत नाही? असा प्रश्न सातत्यानं विचारत होते. पण कंबोजचं इन्टेनशन हीज इंटेन्शन वॉज नॉट गुड… त्याचं इंटेन्शन जर चांगलं असतं तर त्यानं राखी सावंतची तुलना आणखी कोणाशीतरी केली असती.

कारण बिचारी राखी सावंत जी आहे तिचं क्षेत्र गायन, मॉडलिंग, डान्सिंग… काय तिचा मेकओव्हर, काय तिचा तो लूक…फोटोशूट अन् काय-काय भानगडी असतात, आम्ही आमच्या आयुष्यात फोटोशूट कधी केलं? दहावी आणि बारावीच्या हॉलतिकिटासाठी फोटो काढताना. यापलिकडे आम्हाला फोटोचं काही माहीतच नाही. जर त्या बिचाऱ्या माऊलीची तुलना होऊ शकत असेल, तर तिच्या क्षेत्रानुसार तुलना ही आमच्या अमृता वहिनींसोबत होईल.”

🤙 9921334545