
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे काम करणाऱ्या चावी कामगारनी आपली बदली फिल्टर विभागाकडे करावी अशी मागणी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे केली आहे. कळंबा फिल्टर हाऊस येथे झालेल्या बैठकीमध्ये 25 हून अधिक चावी कामगार उपस्थित होते.
यावेळी या बैठकीमध्ये जल अभियंता यांच्या समोर आपल्या मागणी बरोबरच काही तक्रारींचा कामगारांनी पाढाच वाचला. कित्येक वर्ष फिल्टर विभागात काम करणारे कर्मचारी हे आहे त्याच ठिकाणी काम करत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला चावी कर्मचारी आहेत त्यांना वारंवार माजी नगरसेवक तसेच काही स्थानिक नागरिक यांच्याकडून पाण्याबाबतीत शिव्या खायला लागत आहेत. पाणीपुरवठा मध्ये अधून मधून तांत्रिक बिघाड झाला तरी विनाकारण त्रासाला सामोरे जायला लागत.
आम्हीच किती हा त्रास सहन करायचा अशी या कामगारांनी तक्रारी करत यावेळी आपली कैफियत मांडली. जे 3 वर्ष फिल्टर विभागाकडे काम करतायेत त्यांची चावी विभागाकडे बदली करावी तसेच चावी विभागातील काम करणाऱ्यांची फिल्टर विभागाकडे बदली करावी. अशी उपस्थित कर्मचाऱ्यांनी सरनोबत यांच्याकडे मागणी केली.
सोनाबत यांनी यावेळी बैठकीला असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचार करून योग्य तो तोडगा काढला जाईल अशी ग्वाही दिली. या बैठकीस उप जल अभियंता चव्हाण, शाखा अभियंता दीपा पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
