
कोल्हापूर: कोल्हापूर येथील चार्टर्ड अकौटंट अमितकुमार अंकुश गावडे यांचे अकौटंन्सी या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झालेले ते चंदगड गावाचे पहिलेच सुपुत्र आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीए परीक्षा उत्तीर्ण केलेल्या अमितकुमार गावडे यांनी यापूर्वी चंदगड गावाचे पहिले सीए होण्याचा मान देखील पटकाविला होता. बारावी कॉमर्स मध्ये बोर्डात आलेले अमितकुमार गावडे यांनी बीकॉम परीक्षेमध्ये शिवाजी विद्यापीठात पाचवा क्रमांक पटकाविला होता. ते विश्वविक्रमवीर प्रा.डॉ.अनुप्रिया गावडे यांचे वडिल व नाईट कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.अक्षता गावडे यांचे पती आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
