मार्केटिंगची गरज आम्हाला नाही आदित्य ठाकरेंना : दीपक केसरकर

कोल्हापूर : आम्ही लोकांची कामे करत असल्याने आम्हाला मार्केटिंगची गरज नाही,आदित्य ठाकरेंना आहे, अशा शब्दात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे.ते आज कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले,आम्ही लोकांची कामे करतो. मी कोल्हापूरचा पालकमंत्री असल्याने परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मार्केटिंगची गरज आदित्य ठाकरे यांना आहे. त्यांनी अडीच वर्ष मंत्री राहून त्यांनी काही केलं नाही. मुंबईतील सर्वाधिक प्रदुषित झालेली हवा ही आदित्य यांची देणगी आहे. आदित्य ठाकरेंना मार्केटिंगची गरज आहे. त्यांना मोठमोठे सल्लागार असतात. लोकांची बदनामी कशी करायची याच उत्कृष्ठ ट्रेनिंग आदित्य यांना दिलेलं आहे. ते ट्रेनिंग त्यांना लखलाभ होऊ दे ,असेही केसरकर यावेळी म्हणाले.

🤙 8080365706