
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल ला अयोध्याचा दौरा करत आहेत. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आलेली आहे.13 हजाराहून अधिक शिवसैनिक आयोध्याची वारी करणार आहेत.
मुख्यमंत्री यांच्या उपस्थित शरयू नदीच्या किनारी आरती देखील केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी काही जबाबदाऱ्या दिल्या जात असतानाच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. अयोध्येच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना कोणतीही असो जबाबदारी मात्र नाशिकवरच असल्याचे दिसून येत आहे.नाशिक मधून अयोध्येच्या दिशेने एक पदाधिकाऱ्यांचे पथक देखील रवाना झाले आहे.
