
दिल्ली : दिल्लीच्या कथित ‘मद्य धोरण घोटाळ्यात’ तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया यांनी तिहार जेल मधून पत्र लिहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
मनीष सिसोदिया यांनी तुरुंगातून देशवासीयांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या घटनात्मकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान कमी शिकलेले असल्याने विविध देशातील राष्ट्राध्यक्ष त्यांना मिठी मारतात आणि कागदपत्रांवर सह्या करायला लावतात कारण पंतप्रधान कमी शिकलेले असल्याने त्यांना समजत नाही.आज देशातील तरुण महत्त्वाकांक्षी आहे, तो काहीतरी कराण्याची संधी शोधत आहे, त्याला जग जिंकायचे आहे. त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काही वेगळं करायच आहेत. आजच्या तरुणांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता कमी शिकलेल्या पंतप्रधानात आहे का? मागील काही वर्षांत देशभरात 80,000 सरकारी शाळा का बंद करण्यात आल्या? एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत असताना सरकारी शाळांची संख्याही वाढायला पाहिजे होती.
