
ठाणे : ठाण्यात घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचं सांगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर यावरून मनसेनं त्यांना जोरदार टोला लगावला आहे.
वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे. आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांना डिवचलं.
