‘राजाराम ‘ अपात्र अर्जांवर सोमवारी निकालाची शक्यता

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 23 एप्रिलला होत आहे.महाडिक व पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.छाननी प्रक्रियेत विरोधी पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले.

या निर्णयाला पाटील गटाने न्यायालयीन आव्हान दिले होते.या अपात्र अर्जावर साखर सहसंचालकांसमोर गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू असून कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर मोठया प्रमाणात गर्दी केली आहे.या ठिकाणी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असून हा निकाल सोमवारी मिळण्याची शक्यता आहे.

4 एप्रिल रोजी सतेज पाटील गटाच्या 29 अपात्र उमेदवारांनी साखर सहसंचालक कोल्हापूर,यांच्यासमोर त्यांचे म्हणणे मांडले होते.आज राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बाजू मांडण्यात येत आहे.एकूणच परिस्थिती पाहता या 29 अपात्र उमेदवारांच्या सुनावणीचा अंतिम निर्णय सोमवारीच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🤙 8080365706