
मुंबई : भारतातील आघाडीचे रेडिओ नेटवर्क असलेले रेडिओ सिटी सलग 13 व्या वर्षी मुंबई इंडियन्सचा अधिकृत रेडिओ भागीदार असणार आहे. मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटविषयक घडामोडी त्यांच्या चाहत्यांपर्यंत रेडिओच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी रेडिओ सिटी सज्ज झाली आहे.
शहराचे लक्ष वेधून रेडिओ सिटी आपल्या चाहत्यांना खेळ आणि आसपासच्या घटनांबद्दल अपडेट ठेवते. एकत्र विजय साजरा करण्यापासून ते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूचा जयजयकार करण्यापर्यंत, प्रत्येक क्रिकेटप्रेमी हा खेळ जगण्यासाठी रेडिओ नेटवर्कशी संपर्क साधतो. या भागीदारीद्वारे, रेडिओ सिटी या वर्षीच्या हंगामाची ‘मुंबई मेरी जान’ ही थीम ऑन-एअर तसेच डिजिटल जाहिराती, स्पर्धा, आरजेंचा सहभाग या उपक्रमातून लोकप्रिय करत आहे.
