राज्यात पुढच्या 24 तासांत पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे.राज्यात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान देशभरात यंदा 90 टक्क्यांच्या आसपास पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.

🤙 8080365706