देशातील कोरोनाची दैनंदिन वाढ सुरूच

मुबंई : देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २५,५८७ वर पोहोचली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.देशात ४,४३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर ११ जणांचा मृत्यू झाला होता. कोरोनाची ही रुग्णवाढ ६ महिन्यांतील सर्वांधिक आहे. आठवड्याच्या आत रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. बुधवारी कोरोनाने महाराष्ट्रातील ४ जणांचा बळी घेतला. तर दिल्ली, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पाँडेचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या २४ सप्टेंबरनंतरची ही सर्वांधिक दैनंदिन रुग्णसंख्या वाढ आहे.

🤙 8080365706