
ठाणे : ठाण्यात आज ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली. त्यावरून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ठाकरे गटाच्या वतीने आज पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.पण त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. बॅनर आणि पोस्टर नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसंच वेळेतच हा मोर्चा संपवावा, अशीही अट पोलिसांकडून ठेवण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता हा मोर्चा ठाण्यातील तलावपाळी इथल्या शिवाजी मैदानातून सुरू होईल. मग हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने जाईल.
