जतील सर्वात उंच हनुमान मूर्तीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभिषेक

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते १०५ फूट हनुमान मूर्तीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

राज्यात सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. तिरुपती बालाजी संस्थानच्या वतीने 6 एप्रिल 2023 रोजी नांदुरा येथे हनुमान जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सचिवालयाने बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

🤙 8080365706