शेतकरी संघटनेचा कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर निवडणुकीत अर्ज दाखल

कोल्हापूर : ३ एप्रिल २०२३ रोजी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने बाळ उर्फ राजेश सत्यापा नाईक यांनी अर्ज दाखल केला.शेतीमालाच्या भावासाठी आग्रही असलेली एकमेव शेतकरी संघटना बाजार समितीच्या निवडणुकीत ही सक्रिय आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने सदरची निवडणूक ताकतीने लढवून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर यांचे कडून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.माणिक शिंदे, गुणाजी शेलार, शरद जोशी प्रणित संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख उत्तम पाटील, बाबासाहेब गोसावी, जगन्नाथ चिपरीकर, देवदास लाडगावकर आदी उपस्थित होते.

🤙 8080365706