महाविकास आघाडीच्या सभेला नाना पटोले हे उपस्थित राहणार नाहीत

छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजी नगर येथे वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते.परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळतेय.

आजच्या ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सभेची पूर्ण तयारी झाली आहे. अवघ्या तासाभरात सभा सुरु होईल. परंतु या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार नाही. एकीकडे उद्धव ठाकरे हे मुंबईहून रवाना झालेले आहेत. अजित पवारदेखील उपस्थित राहात आहेत. मात्र नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत.

🤙 8080365706