
कानडजे : आज छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे, फडणवीस सरकारच्या वतीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज मविआची सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा आहे. या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटलो यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
