
नवी मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
या विशेष गाड्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.पुणे ते सावंतवाडी (गाडी क्रमांक ०१२११ /०१२१२) ही साप्ताहिक विशेष गाडी पुणे येथून २ एप्रिल ते ४ जून या दरम्यान प्रत्येक रविवारी धावणार आहे. ही गाडी पुणे स्थानकातून रात्री ९.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. त्याचप्रमाणे सावंतवाडी रोड- पनवेल- सावंतवाडी ही गाडी (क्रमांक ०१२१६/०१२१५) आठवड्यातून एकदा ३ एप्रिल ते ५ जून या कालावधीत दर सोमवारी धावेल. ही गाडी सावंतवाडी येथून सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी पनवेलला रात्री ८.३० वाजता पोहोचेल.
