
ठाणे : ठाण्यात दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाने कारवाई केली. अमली पदार्थाचे साठे जप्त केले. ६१.२ लाखाच्या कोकेन एलएसडीसह दोन नायजेरियन आणि एका रिक्षाचालकाला अटक केली.
२९ मार्च आणि ३१ मार्च रोजीच्या दोन घटनांमध्ये एका घटनेत एक नायजेरियन आणि रिक्षाचालक यांच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखेने कासारवडवली पोलीस ठाण्यात एका नजेरियन आरोपीवर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुन्हे शाखा युनिट-५ चे पथक करीत आहे. या दोन्ही घटनेत पोलिसांनी तब्बल १४७ ग्राम कोकेन आणि ०.२२ ग्रॅम वजनाचे एलएसडीचे १५ नग असा ६१ लाख २ हजार ९४० रुपये किमतीचे अमली पदार्थ, रोकड आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला.
